मराठी लग्नाचा बायोडाटा फॉरमॅट

लग्नासाठी मराठी बायोडाटा (marathi marriage biodata) कसा असावा, त्यात कोणती माहिती लागते, एक तयार नमुना, आणि तो मोफत कसा बनवायचा — सगळं एका जागी. खाली दिलेल्या फॉरमॅटप्रमाणे माहिती भरा आणि काही मिनिटांत प्रिंट-रेडी बायोडाटा तयार करा.

आत्ताच मोफत बायोडाटा बनवा १८९ डिझाइन्स पाहा

२ डिझाइन्स कायम मोफत · बाकी ₹36 एकदाच · नोंदणी नाही · मराठी / हिंदी / English

लग्नाचा बायोडाटा म्हणजे काय?

लग्नाचा बायोडाटा — इंग्रजीत marriage biodata किंवा lagnacha biodata — हे स्थळ पाहताना समोरच्या कुटुंबाला दाखवलं जाणारं एका पानाचं परिचय पत्र असतं. त्यात मुलाची किंवा मुलीची वैयक्तिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक माहिती नीटनेटक्या स्वरूपात मांडलेली असते. चांगल्या फॉरमॅटमुळे माहिती पटकन वाचता येते आणि पहिली छाप चांगली पडते.

मराठी बायोडाटा फॉरमॅट — तयार नमुना

खालील नमुन्याप्रमाणे माहिती मांडली की बायोडाटा व्यवस्थित दिसतो. ही उदाहरणादाखल माहिती आहे.

॥ श्री गणेशाय नमः ॥

विवाह बायोडाटा

वैयक्तिक माहिती

नावआदित्य रवींद्र पाटील
जन्मतारीख व वेळ१२ मे १९९८, सकाळी ६:२०
जन्मस्थळपुणे
उंची / रंग५ फूट ९ इंच / गोरा
राशी / नक्षत्रवृषभ / रोहिणी
गोत्र / कुळकश्यप / देशस्थ
शिक्षणB.E. (Computer)
नोकरी / व्यवसायSoftware Engineer, पुणे

कौटुंबिक माहिती

वडिलांचं नाव / व्यवसायरवींद्र पाटील / शेती
आईचं नाव / व्यवसायसुनीता पाटील / गृहिणी
भाऊ / बहीण१ मोठी बहीण (विवाहित)

संपर्क

मोबाईल९८XXXXXX२०
पत्ताताकळी भीमा, ता. शिरूर, पुणे

बायोडाटामध्ये कोणती माहिती असावी?

वरील नमुन्यातील माहिती तीन गटांत विभागता येते:

LagnBiodata मध्ये ३४ तयार फील्ड्स आहेत आणि जे नको ते काढून, हवं ते स्वतःचं जोडता येतं — हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन व शीख अशा सर्वांसाठी योग्य फील्ड्स व देवाची नावं उपलब्ध आहेत.

चांगल्या बायोडाटासाठी टिप्स

तयार आहात? आत्ताच बनवा

वरील फॉरमॅट लक्षात ठेवून LagnBiodata वर काही मिनिटांत मराठी बायोडाटा तयार करा — लाइव्ह प्रिव्ह्यू, १८९ डिझाइन्स, फोटोसह/शिवाय, नोंदणी न करता.

मोफत बायोडाटा बनवा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मराठी बायोडाटा फॉरमॅटमध्ये काय काय असावं?

कुलदैवत/देवाचं नाव, पूर्ण नाव, जन्मतारीख व वेळ, जन्मस्थळ, राशी, नक्षत्र, गोत्र, उंची, रंग, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, पगार, वडिलांचं व आईचं नाव व व्यवसाय, भाऊ-बहीण, आणि मोबाईल नंबर व पत्ता. मुलगा व मुलगी दोघांसाठी फील्ड्स सारखीच असतात.

मराठी बायोडाटा मोफत बनवता येतो का?

होय. दोन साध्या डिझाइन्स पूर्णपणे मोफत आहेत — त्यांचा PDF व HD इमेज वॉटरमार्कशिवाय डाउनलोड होतो. इतर १८७ डिझाइन्ससाठी एका बायोडाटामागे एकदाच ₹36. नोंदणी लागत नाही.

मराठी टाइप करता येत नसेल तर?

इंग्रजीत टाइप करा — aditya patil — आणि ते आपोआप आदित्य पाटील असं मराठीत होतं. हवं तर थेट मराठी कीबोर्डनेही टाइप करता येतं.

बायोडाटामध्ये फोटो लावावा का?

ते ऐच्छिक आहे. फोटोसह आणि फोटोशिवाय दोन्ही प्रकारच्या डिझाइन्स उपलब्ध आहेत — तुमच्या आवडीनुसार निवडा.

बायोडाटा किती पानांचा असावा?

शक्यतो एकाच पानाचा — A4 आकारात. महत्त्वाची माहिती एका पानात नेमकेपणाने बसवली की वाचायला सोपं जातं. डाउनलोड ३०० DPI A4 प्रिंट-रेडी असतो.

इंग्रजीत हवं? Marriage biodata format & maker