अटी व शर्ती
शेवटचा बदल: ऑगस्ट २०२६
१. सेवेचं स्वरूप
LagnBiodata हे विवाह बायोडाटा तयार करण्याचं साधन आहे. बायोडाटा तयार करणं, संपादित करणं आणि PDF किंवा इमेजमध्ये डाउनलोड करणं ही सेवा पुरवली जाते. हे मॅट्रिमोनियल किंवा स्थळ जुळवणारं संकेतस्थळ नाही.
२. तुमची जबाबदारी
बायोडाटात भरलेल्या माहितीची अचूकता ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. आम्ही ती माहिती पाहत नाही, तपासत नाही आणि साठवत नाही.
तुम्ही अपलोड केलेला फोटो वापरण्याचा तुम्हाला अधिकार असला पाहिजे.
३. मोफत व प्रीमियम
दोन डिझाइन्स मोफत आहेत आणि त्या वॉटरमार्कशिवाय डाउनलोड होतात. उर्वरित डिझाइन्सच्या प्रिव्ह्यूवर वॉटरमार्क असतो. ₹36 चं पेमेंट एका डाउनलोडसाठी असतं. डाउनलोडपूर्वी सर्व १८९ डिझाइन्स वापरून पाहता येतात आणि हवे तेवढे बदल करता येतात; डाउनलोड झाल्यावर ते पेमेंट संपतं. तांत्रिक अडचणीमुळे डाउनलोड अपूर्ण राहिल्यास १५ मिनिटांत तोच बायोडाटा पुन्हा घेता येतो. दुसऱ्या बायोडाटासाठी नवीन पेमेंट लागतं. पेमेंटनंतर वॉटरमार्क निघतो आणि सर्व डिझाइन्स उपलब्ध होतात. हे पेमेंट एकदाच आहे; कोणतंही आवर्ती शुल्क नाही.
४. प्रीमियम परत मिळवणे
पेमेंटनंतर मिळालेला ऑर्डर नंबर जपून ठेवा. तो नंबर आणि पेमेंटच्या वेळी दिलेला मोबाईल नंबर वापरून कोणत्याही डिव्हाइसवर प्रीमियम परत मिळवता येतं. ऑर्डर नंबर हरवल्यास संपर्क करा.
५. डिझाइन्सचा वापर
तयार केलेला बायोडाटा तुमचा आहे — तो कुठेही वापरा, छापा, पाठवा. मात्र या साइटवरील डिझाइन्स स्वतंत्रपणे विकण्याचा किंवा स्पर्धात्मक सेवेत वापरण्याचा अधिकार नाही.
६. उपलब्धता
सेवा "जशी आहे तशी" पुरवली जाते. देखभालीसाठी किंवा तांत्रिक कारणांसाठी ती तात्पुरती अनुपलब्ध असू शकते. डेस्कटॉप ॲप इंटरनेटशिवाय चालतं, त्यामुळे त्यावर हा परिणाम होत नाही.
७. मर्यादित दायित्व
या साधनाच्या वापरातून होणाऱ्या कोणत्याही अप्रत्यक्ष हानीसाठी आमचं दायित्व तुम्ही भरलेल्या रकमेपुरतं (₹36) मर्यादित आहे.
८. बदल
या अटी वेळोवेळी बदलल्या जाऊ शकतात. महत्त्वाचे बदल या पानावर तारखेसह नोंदवले जातील.