गोपनीयता धोरण

शेवटचा बदल: ऑगस्ट २०२६

थोडक्यात: तुमचा बायोडाटा — सगळी माहिती आणि फोटो — तुमच्याच ब्राउझरमध्ये राहतो आणि तिथेच PDF तयार होतो. एकच अपवाद: डाउनलोड करताना सहा फील्ड्स (नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव, आईचं नाव, मोबाईल, जन्मस्थळ) एका फिंगरप्रिंटसाठी सर्व्हरकडे जातात — तो फिंगरप्रिंट साठवला जातो, माहिती नाही. फोटो कधीच जात नाही.

१. आम्ही काय साठवत नाही

तुम्ही भरलेली सर्व फील्ड्स आणि अपलोड केलेला फोटो तुमच्या डिव्हाइसच्या स्टोरेजमध्ये (localStorage व IndexedDB) राहतात. PDF आणि इमेज तुमच्याच ब्राउझरमध्ये तयार होतात. फोटो, पत्ता, शिक्षण, पगार, कुंडली — यांतलं काहीही आमच्या सर्व्हरवर कधीच जात नाही.

एक प्रामाणिक अपवाद, आणि तो का आहे: ₹36 चं एक पेमेंट = एक बायोडाटा. हे पाळण्यासाठी सर्व्हरला ओळखावं लागतं की कोणता बायोडाटा — म्हणून डाउनलोडच्या क्षणी सहा फील्ड्स (नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव, आईचं नाव, मोबाईल, जन्मस्थळ) पाठवली जातात, त्यांचा एक फिंगरप्रिंट (SHA-256) काढला जातो, आणि फील्ड्स तिथेच सोडून दिली जातात — फक्त तो फिंगरप्रिंट साठवला जातो. फिंगरप्रिंटवरून मूळ माहिती परत मिळवता येत नाही. नावातलं फक्त पहिलं अक्षर ठेवलं जातं, यासाठी की तुम्हाला सांगता यावं की पेमेंट कोणत्या बायोडाटासाठी वापरलं गेलं. पूर्ण नाव साठवलं जात नाही.

२. आम्ही काय साठवतो

फक्त तुम्ही पैसे भरलेत तरच, आणि फक्त एवढंच:

ही माहिती दोन कारणांसाठी: तुम्ही डिव्हाइस बदललं तरी प्रीमियम परत मिळावं, आणि “एक पेमेंट = एक बायोडाटा” हा नियम पाळता यावा.

तुमची माहिती काढून टाकायची असेल तर — संपर्क करा आणि ऑर्डर नंबर सांगा. वरचे ठसे आम्ही पुसून टाकू. पेमेंटची नोंद (ऑर्डर नंबर, रक्कम, तारीख) मात्र ठेवावी लागते — हिशोबासाठी ती कायद्याने आवश्यक आहे.

२अ. खातं (ऐच्छिक)

खातं बनवणं गरजेचं नाही. त्याशिवायही बायोडाटा बनवता आणि विकत घेता येतो. खातं फक्त एका गोष्टीसाठी आहे: तुमच्या खरेदीची नोंद एका ठिकाणी राहते, फोन बदलला किंवा ब्राउझर साफ केला तरी.

खातं बनवलंत तर आम्ही एवढंच ठेवतो:

कुकी नाही. लॉग इन राहण्यासाठी एक सही केलेला टोकन तुमच्याच ब्राउझरमध्ये ठेवला जातो — या वेबसाइटवर एकही कुकी सेट होत नाही, खातं असो वा नसो.

खातं बंद करायचं असेल तर — संपर्क करा, आम्ही ईमेल आणि पासवर्डचा ठसा पुसून टाकू. पेमेंटची नोंद (ऑर्डर नंबर, रक्कम, तारीख) हिशोबासाठी ठेवावी लागते.

३. वेबसाइट किती लोक वापरतात — मोजणी

कोणतं पान किती वेळा उघडलं गेलं, कोणती डिझाइन जास्त निवडली गेली — एवढं आम्ही मोजतो. नाहीतर कोणती डिझाइन बनवायची आणि काय सुधारायचं हे कळणारच नाही. पण ते आमच्याच सर्व्हरवर होतं — Google Analytics किंवा दुसरं कोणतंही बाहेरचं ट्रॅकिंग टूल या वेबसाइटवर नाही.

प्रत्येक नोंदीत एवढंच असतं:

काय नसतं: कुकीज नाहीत. या मोजणीत तुमचा IP पत्ता साठवला जात नाही (पेमेंट करताना कनेक्शनचा एकतर्फी ठसा ठेवला जातो — कलम २ पहा). बायोडाटातलं एकही अक्षर — नाव, फोटो, पत्ता, फोन — इथे जात नाही.

वेगवेगळे लोक मोजण्यासाठी एक कोड वापरला जातो जो दररोज बदलतो, त्यामुळे आजचा तुम्ही आणि उद्याचा तुम्ही यांचा संबंध जोडता येत नाही. ब्राउझरमध्ये “Do Not Track” चालू असेल तर काहीच पाठवलं जात नाही. डेस्कटॉप ॲपमध्ये ही मोजणी पूर्णपणे बंद आहे — तिथून एकही विनंती बाहेर जात नाही.

४. एक प्रामाणिक अपवाद — लिप्यंतरण

वेबसाइटवर तुम्ही इंग्रजीत टाइप करून मराठी/हिंदी मिळवता, तेव्हा अचूकतेसाठी तो शब्द Google च्या लिप्यंतरण सेवेकडे पाठवला जाऊ शकतो. म्हणजे नावासारखे शब्द Google पर्यंत जातात.

हे बंद करता येतं. एडिटरमधील "अचूक लिप्यंतरणासाठी Google ची सेवा वापरा" हा पर्याय बंद करा — मग सर्व लिप्यंतरण तुमच्याच डिव्हाइसवर होतं आणि एकही अक्षर बाहेर जात नाही. डेस्कटॉप ॲपमध्ये हा पर्याय डिफॉल्ट बंदच असतो.

५. कुकीज व ट्रॅकिंग

तुमचा बायोडाटा साठवण्यासाठी वापरलेलं ब्राउझर स्टोरेज तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे आणि ते तुमच्याच डिव्हाइसवर राहतं. वर कलम ३ मध्ये सांगितलेली आमची स्वतःची मोजणी कुकीजशिवाय चालते.

या वेबसाइटवर एकही कुकी सेट केली जात नाही — ना जाहिरातींसाठी, ना मोजणीसाठी. थर्ड-पार्टी ट्रॅकर नाहीत: Google Analytics, Facebook Pixel यांसारखं काहीही नाही.

अक्षरं (fonts) सुद्धा आमच्याच सर्व्हरवरून येतात. पान उघडताना Google किंवा इतर कोणत्याही बाहेरच्या सर्व्हरकडे एकही विनंती जात नाही — फक्त कलम ४ मधलं लिप्यंतरण, आणि ते तुम्ही बंद करू शकता.

६. तुमची माहिती काढून टाकणे

एडिटरमधील "पुन्हा सुरू" बटण दाबा — सर्व माहिती आणि फोटो तुमच्या डिव्हाइसवरून लगेच पुसले जातात. ब्राउझरचा डेटा साफ केला तरी तेच होतं.

७. संपर्क

गोपनीयतेबाबत काही प्रश्न असल्यास support@lagnbiodata.in वर लिहा, किंवा संपर्क पान पहा.